सह्याद्रिनगर, कांदिवली (प)
+912228696958
info@ndpatilschools.com

पद्मभूषण डॉ.कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या समर्पित जीवनाचा तेजस्वी आलेख

रयत शिक्षण संस्थेचे,

नाव : भाऊराव पायगोंडा पाटील
जन्म : २२ सप्टेंबर १८८७
जन्मगाव : कुंभोज,ता.हातकणंगले,जि.कोल्हापूर (महाराष्ट्र )
शिक्षण : नॉन मॅट्रिक
नोकरी :ओगले ग्लास वर्क्स व किर्लोस्कर ब्रदर्स लि. मध्ये विक्रेता प्रतिनिधी ( १९०९ ते १९२१ )

सामाजिक कार्य

 • महात्मा फुले यांनी स्थापन केलेल्या सत्यशोधक चळवळीत भाग घेऊन प्रभावी कार्य केले.
 • अस्पृश्यता निवारण मोहिमेत आघाडीचा सहभाग.
 • राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी स्थापन केलेल्या हरिजन सेवा संघ या संस्थेत सक्रीय भाग घेऊन काम केले .
 • महाराष्ट्रातील एक थोर संत गाडगे महाराज यांनी स्थापन केलेल्या सामाजिक ऐक्य,न्याय,बंधुभाव व हरिजनोद्धार या मिशन संस्थेत सक्रीय भाग.
 • थोर समाज सुधारक कै.विठ्ठल रामजी शिंदे यांनी स्थापन केलेल्या डिप्रेस्ड क्लास मिशनचे विश्वस्त म्हणून काम.
 • मुंबई राज्य बॅकवर्ड क्लास वेल्फेअर बोर्डाचे सदस्य म्हणून अनेक वर्षे काम.
 • हरिजन सेवेसाठी स्थापन केलेल्या सातारा जिल्हा बोदाचेर सदस्य म्हणून अनेक वर्षे काम.
 • शशिकला सॅनिटोरियम ( टी.बी.हॉस्पिटल ) जयसिंगपूर,जि.कोल्हापूर या संस्थेचे विश्वस्त म्हणून काम.
 • सातारा डिस्ट्रीक्ट डेव्हलपमेंट बोर्डाचे सदस्य म्हणून अनेक वर्षे काम.
 • हरिजनांसाठी स्थापन केलेल्या संत चोखामेळा धर्मशाळा,पंढरपूर याचे विश्वस्त म्हणून काम.
 • रुरल डेव्हलपमेंट बोर्ड,सातारा व प्रोव्हिन्सिअल बोर्ड,मुंबई याचे अनेक वर्षे काम.
 • पुणे येथे सामाजिक बंधुता व न्याय यासाठी भरलेया सामाजिक परिषदेत सक्रीय सहभाग.
 • सातारा रोड येथे सर धनजीशा कूपर यांना लोखंडी कारखाना उघडण्यासाठीकामगारांच्या मुलामुलींना मोफत शिक्षण देण्याच्या अटीवर मोठे सहाय्य.

सहकार

 • कोरेगाव,जि.सातारायेथे गरीब शेतकऱ्यांकरिता सहकारी शेतीची योजना १९११ साली सुरु केली व राबविली .
 • १९४० साली रयत शिक्षण संस्थेच्या सेवकांसाठी को.ऑपरेटीव्ह सोसायटी स्थापन केली.पुढे या सोसायटीचे बँकेत रुपांतर झाले.
 • १९४२ साली संस्थेच्या सेवकांसाठी को.ऑपरेटीव्ह स्टोअर्स सुरु केले.
 • देवापूर,जि.सातारा या दुष्काळी भागात सर दोराबजी टाटा ट्रस्टच्या रुरल वेल्फेअर बोर्डातर्फे नऊ गावांच्या सर्वांगीण विकासाची योजना राबविली.
 • देवापूर या भागात को.ऑप फार्मिंग सोसायट्या स्थापन करून अल्प भू-धारकांना शेतीचा विकास करून त्यांचे जीवनमान उंचावले.

शैक्षणिक कार्य

 • १९१९ मध्ये काले,ता.कराड ,जि.सातारा (महाराष्ट्र) या ठिकाणी खेड्यांतील मुलांच्या शिक्षणासाठी रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली .पुढे या संस्थेचे कार्यालय सातारा येथे हलविले.
 • १९२४ साली सर्व जाती धर्माच्या विद्यार्थ्यांसाठी सातारा येथे एक मिश्र वसतिगृह स्थापन केले व १९२७ साली राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या शुभहस्ते थोर समाजसुधारक राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचे नाव सदर वसतिगृहास दिले.या वसतिगृहास महात्मा गांधींनी स्वतः स्थापन केलेल्या हरिजन सेवक फंडातून वार्षिक ५०० रुपये मदत चालू केली.
 • १९३२ साली पुणे येथे उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी युनियन बोर्डिंग हाऊसची स्थापना केली ( मिश्र वसतिगृह )
 • १९३५ मध्ये रयत शिक्षण संस्था ही कायद्याप्रमाणे रजिस्टर केली व प्राथमिक शिक्षकांना ट्रेन्ड करण्यासाठी ट्रेनिंग कॉलेज सुरु केले.
 • १९३६ साली सातारा येथील एक समाजसेवक रा.ब.रा.काळे यांच्या नावाने सातारा येथे पहिली मराठी शाळा सुरु केली.
 • १९३८ साली संस्थेतर्फे पाह्हिली व्हालंटरी प्राथमिक शाळा डोंगराळ भागातील यवतेश्वर या खेडेगावी सुरु केली.अशाच प्रकारे ५७८ प्राथमिक डोंगराळ व दुष्काळी भागातील खेडेगावात सुरु केल्या.
 • १९४० मध्ये सर्व स्तरांतील गोरगरीब विद्यार्थ्यांकरिता महाराजा सयाजीराव गायकवाड यांच्या नावाने सातारा येथे पामोफ्त व वसतिगृहयुक्त माध्यमिक शाळा सुरु केली.यापुढे त्यांनी त्यांच्या हयातीत ग्रामीण भागात १०१ माध्यमिक शाळा सुरु केल्या.
 • १९४२ साली मुलींसाठी मिश्र वसतिगृह सुरु केले व प्राथमिक स्त्री शिक्षिकांसाठी जिजामाता अध्यापिका विद्यालय या नावाचे ट्रेनिंग कॉलेज सुरु केले.
 • १९४७ साली महाराष्ट्राचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाने उच्च शिक्षण देणारे मुंबई राज्याच्या ग्रामीण भागातील पहिले महाविद्यालय सातारा येथे सुरु केले.ते सुरुवातीस काही वर्षे मोफत व वसतिगृहयुक्त म्हुणुन चालविले.नंतर बाहेरचे विद्यार्थी घेण्यास सुरुवात केली.
 • १९५४ साली महाराष्ट्राचे थोर संत गाडगे महाराज यांच्या नावाने कराड या तालुक्याच्या ठिकाणी संस्थेतर्फे दुसरे महाविद्यालय सुरु केले.
 • १९५५ साली भारताचे थोर नेते मौलाना आझाद यांच्या स्मरणार्थ सातारा येथे माध्यमिक शिक्षकांना प्रशिक्षित करण्यासाठी बी.एड.कॉलेज सुरु केले.

इतर शैक्षणिक संस्थांमधील सहभाग

 • पुणे विद्यापीठ ,कोर्ट या अधिकार मंडळावर राज्यपाल नियुक्त सदस्य म्हणून काम केले.
 • महात्मा गांधी विद्यामंदिर,मालेगाव,जि.नाशिक या संस्थेच्या सल्लागार मंडळावर सदस्य म्हणून काम .
 • सांगली येथील लठ्ठे एज्युकेशन सोसायटी या कमिटीवर सदस्य म्हणून काम .
 • मुंबई राज्याच्या बोर्ड ऑफ एज्युकेशन या कमिटीवर सदस्य म्हणून काम
 • मुंबई राज्य दि प्रोव्हिन्सियल बोर्ड फॉर एज्युकेशन यावर सदस्य म्हणून काम.

स्वावलंबी शिक्षण योजना

कर्मवीर भाऊराव पाटील यांनी रयत शिक्षण संस्थेच्या सर्व शाळा –कॉलेजमध्ये “कमवा व शिका” ही योजना सुरु करून गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना स्वावलंबी शिक्षणाचा मार्ग आखून दिला .या अभिनव योजनेमुळे विद्यार्थ्यांमधील लाचारी वृत्ती जाऊन स्वाभिमान निर्माण झाला व त्यांना श्रम-प्रतिष्ठेचे महत्त्व पटले. स्वावलंबी शिक्षण योजनेचा हा प्रयोग भारतातील पहिला असावा असे वाटते.

बहुमान- गौरव

 • श्री.भाऊराव पाटील यांच्या थोर सामाजिक व शैक्षणिक कार्याबद्दल त्यांचा समाजाने व शासनाने यथोचित गौरव केलेला आहे.
 • जनतेने त्यांना ‘कर्मवीर’ म्हणून संबोधले.
 • कोल्हापूर येथील व्यापाऱ्यांनी कर्मवीर भाऊरावांनान१९४५ साली रुपये २५००० ची थैली देऊनत्यांचा सत्कार केला.
 • सातारा जिल्हा विद्यार्थी संघटनेने संत गाडगे महाराज यांच्या शुभहस्ते कर्मवीर भाऊराव यांना एक लाख रुपयांची थैली १९४८ साली अर्पण केली व त्यांचा सत्कार केला.
 • किर्लोस्कर ब्रदर्स लि.किर्लोस्करवाडी जि.सांगली या कारखान्यातील कामगारांनी १९५२ साली कर्मवीर भाऊराव यांना रु.२५०००/- ची थैली देऊनत्यांचा सत्कार केला.
 • भारत सरकारने १९५९ मध्ये ‘पद्मभूषण’ हा किताब दिला.
 • पुणे विद्यापीठाने १९५९ मध्ये ‘डी.लिट्.’पदवी देऊन त्यांचा गौरव केला.
 • अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांनी मानपत्र देऊन व सत्कार कर्ण त्यांचा गौरव केला.
 • १९५९ साली अहमदनगर जिल्ह्यातील जनतेने एक लाख रुपयांचा निधी देऊन गौरव केला.

महानिर्वाण

९ मे, १९५९ रोजी पुणे येथे ससून हॉस्पिटलमध्ये त्यांचे निधन झाले.