सह्याद्रिनगर, कांदिवली (प)
+912228696958
info@ndpatilschools.com

प्रा.डॉ.एन.डी.पाटील यांचा जीवनक्रम

रयत शिक्षण संस्थेचे,

संपूर्ण नाव : नारायण ज्ञानदेव पाटील
जन्म : १५ जुलै १९२९ – ढवळी ( नागाव ), जि.सांगली येथे अशिक्षित शेतकरी कुटुंबात जन्म

शिक्षण : एम.ए. ( अर्थशास्त्र ), पुणे विद्यापीठ,१९५५; एल.एल.बी.( १९६२ ) पुणे विद्यापीठ

अध्यापन कार्य

 • १९५४- १९५७ छत्रपती शिवाजी कॉलेज,सातारा येथे प्राध्यापक तसेच ‘कमवा व शिका’ या योजनेचे प्रमुख व रेक्टर
 • १९६० साली कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेज,इस्लामपूर येथे प्राचार्य

शैक्षणिक क्षेत्रातील कार्य

 • शिवाजी विद्यापीठ – पहिल्या सल्लागार समितीचे सदस्य १९६२
 • शिवाजी विद्यापीठ – सिनेट सदस्य १९६५
 • शिवाजी विद्यापीठ – कार्यकारिणी सदस्य १९६२-१९७८
 • शिवाजी विद्यापीठ – सामाजिकशास्त्र विभागाचे डीन १९७६-१९७८
 • सदस्य, प्राथमिक शिक्षण आयोग,महाराष्ट्र राज्य १९९१
 • रयत शिक्षण संथेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य- १९५९ पासून
 • रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन – १९९० पासून
 • दक्षिण महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळ ,बेळगाव अध्यक्ष – १९८५ पासून

राजकीय कार्य

 • १९४८ – शेतकरी कामगार पक्षात प्रवेश
 • १९५७ – मुंबई गिरणी कामगार संघटनेचे सरचिटणीस
 • १९६०-६६,१९७०-७६,१९७६-८२ अशी १८ वर्षे महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य
 • १९६९- १९७८, १९८५ – २०१० – शे.का.प.चे सरचिटणीस
 • १९७८-१९८० – सहकारमंत्री ,महाराष्ट्र राज्य
 • १९८५-१९९०- महाराष्ट्र विधानसभा सदस्य (कोल्हापूर मतदारसंघाचे प्रतिनिधी )
 • १९९९-२००२ – निमंत्रक लोकशाही आघाडी सरकार
 • महाराष्ट्र राज्य सीमाप्रश्न समितीचे सदस्य व सीमा चळवळीचे प्रमुख नेते

मिळालेले सन्मान / पुरस्कार

 • भाई माधवराव बागल पुरस्कार – १९९४
 • स्वामी रामानंदतीर्थ विद्यापीठ,नांदेड – डी.लीट.पदवी, १९९९
 • राष्ट्रीय बियाणे महामंडळ ( अध्यक्षपद )भारत सरकार – १९९८ – २०००
 • डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ – डी.लीट.पदवी, २०००
 • विचारवेध संमेलन ,परभणी अध्यक्षपद- २००१
 • शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर – डी.लीट.पदवी
 • शाहीर पुंडलिक फरांदे पुरस्कार

भूषविलेली पदे

 • रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य
 • समाजवादी प्रबोधिनी ,इचलकरंजी – उपाध्यक्ष
 • अंधश्रद्धा निमूर्लन समिती,महाराष्ट्र – अध्यक्ष
 • डॉ.बाबासाहेब आंबेडकर अकादमी , सातारा – अध्यक्ष
 • जागतिकीकरण विरोधी कृतिसमिती – मुख्य निमंत्रक
 • म.फुले शिक्षण संस्था ,इस्लामपूर – अध्यक्ष
 • दक्षिण महाराष्ट्र शिक्षण प्रसारक संस्था ,बेळगाव – अध्यक्ष
 • महाराष्ट्र राज्य सीमा प्रश्न समिती – सदस्य

प्रसिद्ध झालेले लेखन

 • समाजविकास योजनेचे वस्त्रहरण (पुस्तिका)
 • शेतजमिनीवरील कमाल मर्यादा आणि महाराष्ट्र सरकारचा प्रतिगामी कायदा (पुस्तिका ) १९६२
 • कॉंग्रेस सरकार आणि शेतकऱ्यांची लूट (पुस्तिका ) १९६२
 • शेतीमालाला किफायतशीर किमतीची हमी आणि घाऊक व्यापाराचे राष्ट्रीयीकरण (पुस्तिका ) १९६३
 • वाढती महागाई आणि ग्राहकांची ससेहोलपट ( पुस्तिका ) १९६६
 • महाराष्ट्र सरकारच्या श्वेतपत्रिकेचे ( White Paper ) कृष्णस्वरूप (पुस्तिका) १९६७
 • शेतीमालाच्या किफायतशीर किमतीची कैफियत ( पुस्तक )१९७०
 • शेवटी हे शिक्षण आहे तरी कोणासाठी ? ( पुस्तिका ) १९९२
 • महर्षी विठ्ठल रामजी शिंदे ( पुस्तिका )
 • नववे विचारवेध संमेलन परभणी, अध्यक्षीय भाषण , २००१ (नवसाम्राज्यवादी युगातील भारतीय लोकशाही समोरील आव्हाने )

रयत शिक्षण संस्थेतील विशेष कार्य

 • चेअरमन पद काळात : औद्योगिक प्रशिक्षण संस्था,आश्रमशाळा,साखरशाळा,नापासांची शाळा,श्रमिक विद्यापीठ,संगणक शिक्षक केंद्र,कर्मवीर भाऊराव पाटील इन्फर्मेशन अॅण्ड टेक्नोलॉजी इन्स्टिट्यूट, ‘कमवा व शिका’ या योजनेवर भर ,स्पर्धा परीक्षा केंद्रे ,गुरुकुल प्रकल्प,लक्ष्मीबाई पाटील शिष्यवृत्ती योजना,सावित्रीबाई फुले दत्तक – पालक योजना यांची राबणूक,दुर्बल शाखा विकास निधी,म.वि.रा.शिंदे अध्यासन केंद्रे आदींची स्थापना,कर्मवीर विद्याप्रबोधिनीमार्फत विविध पुस्तकांची निर्मिती.
 • डॉ.बाबासाहेब आंबेडकर अकादमी,समाजवादी प्रबोधिनी,अंधश्रद्धा निर्मुलन समिती या संस्थांच्या सहकार्याने विद्यार्थी, शिक्षक –प्राध्यापक प्रबोधन कार्याला चालना.

एन.डी.सरांना अखेरचा लाल सलाम

प्रा.डॉ.एन.डी.पाटील – भावपूर्ण श्रद्धांजली -शोक सभा -दि.27/1/2022 एन.डी.सरांना अखेरचा लाल सलाम